गुरूवारी महायुतीचे जागावाटप जाहीर होणार?

0

मुंबई : ५ वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्या वेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपाच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. आम्ही नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते तर एमआयएमची १ जागा अशा निवडून आल्या होत्या मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त ३ जागा लढवणार, अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्र पक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

महायुतीतील जागावाटप ९९ टक्के पूर्ण झाले आहे. जागावाटपाबाबत महायुतीत कोणतेही गैरसमज नाहीत. येत्या २८ मार्चला मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. उमेदवार बदलण्याच्या केवळ अफवा असून तुमच्या मनात जो आहे तो उमेदवारच तिथे देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच सुनेत्रा पवार यांनाच बारामतीतून उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech