नाशिक – महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी येथे भारतीय खेल प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया)आणि खेलो इंडिया यांच्या “अस्मिता” खेलो इंडिया या उपक्रमाअंतर्गत आयोजित पश्चिम विभागाच्या खेलो इंडिया वुमन्स लीग ज्यूदो स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रासह, गुजराथ, राजस्थानच्या सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पदकांची कमाई केली. आजच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या सामन्यात सबज्यूनियर गटात ५२ किलो गटात महाराष्ट्राच्या दीक्षा नाईकने अंतिम फेरीत गुजराथच्या सूफी माजगुलला पराभूत करून महराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. कॅडेट गटात महाराष्ट्राच्या वैभवी आहेरने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या गटात अंतिम फेरीत आपले प्रवेश मिळविला. वैभवी आहेरने दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्याच प्राणलीला पराभूत केले टर उपउपात्य फेरीत छातीसगडच्या हेबंती नाग हिला पराभूत केले. तर उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या वृंदा शेलार हिचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. तिची अंतिम लढत राजस्थानच्या ज्योति सैनी हिच्याशी होणार आहे.
इतर सामन्यात सब ज्यूनियर गटामध्ये ४८ किलो गटात गुजराथच्या तमन्ना माजगूळने सुवर्णपदक मिळविले तर महाराष्ट्राच्या दिया कदमला रजत पदकावर समाधान मानावे लागले. तर महाराष्ट्राच्या ईश्वरी क्षीरसागर आणि सुभश्री पोतदार यांनी कास्य पदक मिळविले. ४० किलो गटात गुजराथच्या दिव्या सर्वरियाने सुवर्ण आणि लक्ष्मी मन्सूरियाने रजतपदक मिळविले. आयेशा शेख(महाराष्ट्र) आणि पुंजा चौहाण(गुजराथ) यांनी संयुक्त कास्य पदक मिळविले. ४४ किलो गटात लावण्या सिंह(राजस्थान) सुवर्ण, लाभू बाबलिया(गुजराथ) रजत आणि महाराष्ट्राच्या अनूश्री कायंदे आणि त्रीषा जाधवयांनी कास्यपदक मिळविले.या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, गुजराथ, गोवा, मध्य प्रदेश आणि दीव – दमण अश्या सात राज्यांच्या ८९४ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. उद्या उर्वरित सामने खेळविले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली. पारितोषिके – या स्पर्धेमध्ये विजय मिळवणाऱ्या खेळाडूंना ४ लाख सव्वीस हजार रुपये रोख पारितोषिके, आकर्षक मेडल्स आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धनंजय भोसले, शैलेश टिळक, योगेश धाडवे, रवींद्र मेटकर, योगेश शिंदे, विजय पाटील, स्वप्नील शिंदे, वाघचौरे, सुहास मैंद त्यांचे सर्व सहकारी आणि राष्ट्रीय पंच, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.