चेंगराचेंगरीनंतर महाकुंभ परिसर वाहनमुक्त, मुख्यमंत्र्यांनी घेतला परिसराचा आढावा

0

प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता. प्रयागराज महाकुंभातील संगम नदीच्या काठावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आणि भाविकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या परिसराचा आढावा घेतला आणि हा परिसर ४ फेब्रुवारीपर्यंत वाहनमुक्त करून व्यवस्थेत ५ मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. महाकुंभ मेळ्यात ५ मोठे बदल करण्‍यात आले आहेत. महाकुंभ परिसर नो-व्हेइकल झोन (वाहनमुक्त क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे. परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. आता यापुढे महाकुंभ परिसरातील गर्दी नियंत्रित करणे आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्‍याला प्रशासनाने प्राधान्‍य दिले आहे. भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार महाकुंभ मेळा परिसर वाहनमुक्त क्षेत्र असेल.

व्हीव्हीआयपी पासने देखील वाहनांना महाकुंभ परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था असेल. तसेच बाहेरील जिल्ह्यांमधून येणारी वाहने प्रयागराजच्‍या सीमेवरच थांबवली जातील. आगामी ४ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी असेल. महाकुंभमेळ्यातील पुढील अमृत स्नान ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला आहे. महाकुंभाला अमृत स्‍नानासाठी येणारी लाखो भाविक वाराणसी आणि अयोध्येला दर्शनासाठी जात आहेत. त्‍यामुळे पुढील दोन दिवस परिसरात भाविकांची अलोट गर्दी असणार आहे. आशिष गोयल आणि एडीएचे माजी उपाध्यक्ष भानू गोस्वामी यांना वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी दिले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech