आगरी महोत्सवात: माजी केंर्द्रीय मंत्री कपिल पाटील यांनी लगावला टोला
मुरबाड : भिवंडी लोकसभा व मुरबाड विधानसभेतील आगरी समाजाकडून सालाबाद प्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, यात गोरगरीब विद्यार्थ्याना शैक्षणीक साहित्य वाटप करून पालकांना एक मदतीचा हात दिला जातो, प्राविण्य संपादन केेलेल्या विद्यार्थीना उदात्त मनाने गुणगौरव देखील केला जातो,आगरी महोत्सव साजरा करून समाज एकत्र आणण्याचे काम केले जाते.
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच स्वागत आदल्या दिवसी जल्लोषात साजरा केला जातो काल मुरबाड-बदलापुर येथील आगरी महोत्सवात माजी पंचायत राजमंत्री खा. कपिल पाटलांनी असा लगावला टोला? ते बोलले की एकाच साखरेने भरलेल्या काचेच्या बरणीत काळ्या मुंग्या व लाल मुंग्या ह्या गुण्या गोंविदाने राहत असतात एखादा संधी साधू काय करतो तो हि बरणी खालून वरून जोरजोरात हलवून निघून जातो व मग आतल्या मुंग्या एकमेकावर राग काढून चावे घ्यायला लागतात, तर अशा बरणी हलविणाऱ्या पासून सावध राहण्याचा ईशारा या उदाहरणाने त्यांनी दिला. मात्र, हा टोला कुणाला लगावला यावर प्रश्न चिन्ह लागले आहे.
सगळेच धडे काही शाळेत शिकविले जात नाहीत तर काही धडे हे संधीसाधू मतलबी वृत्तीच्या माणसाकडून शिकायला मिळतात, आपण आपली स्वताची ओळख स्वतः निर्माण करायला हवं की उद्या कोणाला बोलायला नको की. मी याला मी मोठा केलयं , तसही अस फुकटच श्रैय लाटणारे काही कमी नाहीत म्हणून सावधगिरी बाळगुन कोणी आपल्याला फसवलं या दुखा पैक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. सरत्या वर्षाला निरोप देऊन नविन वर्षाला सामोर जाण्याच मनोदय हजारो समाज बांधवाच्या साक्षीन माजी पंचायत राजमंत्री खा कपिल पाटलांनी व्यक्त केले