अमरावती : मुंबईतील वरळी पोलिसांनी दर्यापुरातील एका घरातून ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या १२ जणांना अटक केल्याने संपूर्ण शहरात चांगलीच खळबड उडाली आहे. तिन्ही आरोपी दर्यापुरातील साईनगर भागातील सदानंद कॉलनीतील बंडू पवार यांच्या घरात गेल्या ३ महिन्यापासून भाडयाने राहत होते. आरोपींच्या ताब्यातून लॅपटॉप, मोबाइल, सीमकार्ड, कार, दोन दुचाकी जप्त केली असून मुंबई पोलिस सर्व आरोपींना ट्राजिंक रिमांडवर मुंबईला घेऊन जाणार आहे. माहितीनुसार, मुंबईतील वरळी पोलिसा ठाण्यात दोन महिन्यापूर्वी ऑनलाईन फ्रॉडचे अनेक गुन्हे दाखल झाले. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यातील आरोपी जे लॅपटॉप व मोबाइल वापरत होते त्यांच्या आयपी अॅड्रेसचे लोकेशने मुंबई सायबर पोलिसांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील साई नगर भागातील टॉवरचे मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून लोकेशन एकाच ठिकाणचे दिसत असल्याने मुंबई वरळी पोलिसांचे एक पथक दर्यापुरात दाखल झाले.
मुंबई पोलिसांनी दर्यापुर पोलिसांच्या मदतीने सदानंद कॉलनीतील बंडू पवार यांच्या घरातील पहिल्या माळ्यावर असलेल्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या १२ आरोपींना अटक करून दर्यापुर पोलिस ठाण्यात त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दर्यापुर न्यायालयातून आरोपींचा ट्रान्जींक रिमांड रिमांड मिळवून त्यांन मुंबईला नेण्याची प्रक्रिया सुरू केली. मुंबई पोलिसांनी दर्यापुर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने चांगलीच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १२ मोबाइल, ५ ते ६ लॅपटॉप, विविध कंपन्यांचे अनेक सीमकार्ड, एककार वदोन दुचाकी सुध्दा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.