ठाणे – ठाणे महानगर पालिका आणि नाना पालकर स्मृति समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी, ठाणे पूर्व इथे १० बेडचे डायलिसीस सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोपरी इथे श्री मां बाल निकेतन शाळेच्या मागे असलेल्या नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्र इथे हे डायलिसीस सेंटर तयार करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी डायलिसिस साठी १० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या डायलिसिस केंद्रात रुग्णांवर फक्त ३५० रुपयात उपचार करण्यात येतील. तर गरीब रुग्णांवर किंवा ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा पेशंटना राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेनुसार डायलिसिस चे उपचार विनामूल्य केले जातील.
नाना पालकर स्मृती समिती ही गेल्या ५५ वर्षांपासून रुग्ण सेवेसाठी काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या परळीतल्या आठ मजली इमारतीत १६ मशिनच्या माध्यमातून गेली २० वर्ष डायलिसिस केलं जातं. याशिवाय कॅन्सर पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प किमतीत राहण्याची आणि जेवण, नस्त्याची व्यवस्था करण्यात येते.
नाना पालकर स्मृती समितीच्या ठाणे शाखेतर्फे कोरोना काळात सुमारे 200 गरजूंना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय आजारी रुग्णांसाठी लागणरे व्हीलचेअर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वॉटर बेड फोल्डिंग बेड यासह विविध प्रकारचे रुग्ण उपयोगी साहित्य सुद्धा अल्प किमतीत नाना पालकर स्मृती समितीच्या वृंदावन सोसायटी, ठाणे इथल्या कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येते. ठाणे महानगरपालिका नाना पालकर स्मृती समिती आपल्याला आवाहन करते ही सर्व गरजू डायलिसिस रुग्णांपर्यंत हा संदेश पोहोचवावा आणि अल्प किमतीतल्या डायलिसिसच्या उपचारासाठी पुढील पत्त्यावर आणि फोन नंबर वर संपर्क साधावा.