खडवली नदी किनाऱ्यातील धाबे आगीत जळून खाक

0

(टीम ठाणेकर)
टिटवाळा – खडवली भातसा नदीच्या पात्रातील धाब्यांना लागली आग ते जळून खाक झाले आहेत.
कल्याण तालुक्यातील खडवली येथे भातसा नदी आहे, नदिचे पाणी अतिशय स्वच्छ आहे, आणि तेच पाणी परिसरातील अनेक गाव पितात, खडवलीची भातसा नदी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दररोज पर्यटक नदीवर येत असतात. रविवारी दुपारच्या वेळेस भातसा नदीच्या पलीकडच्या पात्रातील म्हणजे भिवंडी तालुक्यातील भाग असुन त्या भागातील धाब्यांना अचानकपणे आग लागली.
धाबे गवताचे(कसार)आसल्याने आगीने रुद्र रुप धारण केले व अनेक धाबे जाळुन खाक झाले. नदिजवळ असलेल्या पर्यटकांची एकच धावपळ उडाली.परंतु सुदैवाने पर्यटक कोणीही जखमी किंवा हानी झाली नाही. परंतु हातावर पोट भरणाऱ्या धाब्या मालकांचे नुकसान झाले आहे. हे धाबे पर्यटकांना आराम करण्यासाठी,जेवणासाठी, तसेच कपडे बदलणे साठी आहेत.याबाबत खडवली तलाठी कायौलय येथे चौकशी केली आसता त्यानी सांगितले की नदिकडचा पलिकडचा भाग भिवंडी तालुका मध्ये येतो तहसीलदार भिवंडी त्याच्याकडे संपर्क साधा असे सांगितले.
सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, तसेच पयैटकांनाहि काहिही झाले नाही, काही झाले असते तर याला जबाबदार कोण भातसा प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे,

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech