सिंधुदुर्ग : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी आज एकाच गाडीतून आणि नंतर एकाच विमानातून “टेक ऑफ “केल्याने सिंधुदुर्गवासियांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राणे आणि दीपक केसरकर यांच्यात गेले काही वर्षे राजकीय वैर पहायला मिळाले.पण निवडणुकी नंतर या दोघांत दिलजमाई झाली. आज निलेश राणे हे
सावंतवाडी महोत्त्सवाला आले होते. त्यावेळी या दोघां नेत्यामध्ये भरभरून प्रेम उफाळलेले दिसले.
नंतर या दोघांनाही मुंबईच्या दिशेने निघायचे होते.
त्यावेळी केसरकर यांनी आमदार राणे यांना आपल्या गाडीत बसण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. निलेश राणे केसरकर यांच्या गाडीत बसून दोघेही गोव्याकडे रवाना झाले. गोव्याला गेल्यावर हे दोघे विमानाने एकत्र मुंबईला आले. प्रवासादरम्यान गाडीत काय गुप्तांगु झाल्या हे कळू शकले नाही.पण दोन्ही नेत्यांची गळाभेट झाल्याने सिंधुदुर्ग वासियांच्या भुवया उंचावल्या आहेत,अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.