केरळ कोर्टाचा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरणी सुनावली 141 वर्षाची शिक्षा

0

तिरुअनंतपुरम : केरळच्या एक न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एका व्यक्तीला दोषी ठरवून 141 वर्षाच्या तुरुंगवासाचे शिक्षा सुनावली. आई घरी नसताना नराधम पिल्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन सावत्र मुलीवर 7 वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला केरळच्या न्यायालयाने दोषी ठरवून 141 वर्षांची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपीला 7.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. त्या व्यक्तीला 40 वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल, कारण त्याला दिलेल्या तुरुंगवासाची शिक्षा सर्वोच्च होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या शिक्षा एकाच वेळी या व्यक्तीला भोगाव्या लागणार आहेत. शिक्षेशिवाय न्यायालयाने या दोषी व्यक्तीला 7.85 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. तसेच, न्यायालयाने पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

दोषी आणि पीडिता हे तामिळनाडूचे रहिवासी असून सावत्र वडील 2017 पासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते, असे या प्रकरणाशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एका मित्राच्या सल्ल्यानुसार, मुलीने या धक्कादायक घटनेविषयी तिच्या आईला सांगितले आणि आईने पुढे पोलिसांना कळवले. याप्रकरणी केरळच्या मंजेरी फास्ट ट्रॅक स्पेशल न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ ए. एम. यांनी या सदर आरोपीला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा, आयपीसी आणि बाल न्याय कायद्याच्या विविध तरतुदींनुसार एकूण 141 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तथापि त्या व्यक्तीला चाळीस वर्षे तुरुंगवास भोगाव लागेल कारण त्याला दिलेल्या तुरुंगवासाची शिक्षा सर्वोच्च होती आणि 29 नोव्हेंबरच्या न्यायालयाचे आदेशानुसार वेगवेगळ्या शिक्षा एकाच वेळी या व्यक्तीला भोगावे लागणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech