मुंबई : बॉलिवुड जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. जान्हवी कपूर तिच्या कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत आंध्र प्रदेशमध्ये भगवान व्यंकटेशाच्या दर्शनाला गेली होती. मंदिरात जाताना तिने जांभळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. दोघेही यावेळी खूप गोड दिसत होते. देवदर्शनादरम्यानचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाची साडी तसेच जांभळ्या रंगाच ब्लाऊज परिधान केला आहे. याच पकड्यांतील काही फोटो जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे शिखर पहाडिया हा दक्षिण भारतीय लोकांप्रमाणे पांढऱ्या रंगाचे धोतर आणि वर गमछा परिधान करून देवदर्शनाला पोहोचला होता. या दोघांना पाहण्यासाठी मंदिर परिसरात लोकांनी चांगलीच गर्दी केली होती.
अभिनेत्री जान्हवी कपूरने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलंय. विशेष म्हणजे ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना जान्हवी तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, या बाबत अपडेट्स देत असते. दरम्यान, जान्हवी कपूर थेट आंध्र प्रदेशमदील तिरुपती मंदिरात देवदर्शनला पोहोचली आहे. देवदर्शनाला जातानाचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे या देवदर्शनाला जाताना जान्हवीसोबत तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून जान्हवी आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. हे दोघे अनेकवेळा एकत्र दिसलेले आहेत. विशेष म्हणजे जान्वही कपूरनेदेखील या नात्याचा अप्रत्यक्षरित्या अनेकवेळा उल्लेख केलेला आहे. लहानपणापासून हे दोघे एकमेकांना ओळखत असून ते जिवापाड प्रेम करतात असे बोलले जाते.
जान्हवी कपूरने याआधी ‘शिखर’ या नावाचे पेंडेंट परिधान केले होते. त्याचे फोटोदेखील चांगलेच व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा फक्त जान्हवीच नव्हे तर जान्हवीच्या कुटुंबीयांनादेखील आवडतो. मिळालेल्या माहितीनुसार 2025 सालाच्या शेवटपर्यंत शिखर आणि जान्हवी एकमेकांशी लग्न करू शकतात. या लग्नसोहळ्याची मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जान्हवी कपूर शिखरला प्रेमाने शिखू असं म्हणते तर शिखरदेखील जान्हवीला प्रेमाने लाडो असं संबोधतो. दरम्यान, जान्हवी कपूरचा येत्या 25 जुलै रोजी परम सुंदरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.