आयटी हब हिंजवडील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार रोहित पवारांचा गौप्यस्फोट

0

पुणे : देशातील आयटी क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राकडे बघायचे झाले तर सर्वांत प्रथम महाराष्ट्रातील पुणे शहराचे नाव पहिल्या क्रमांकावर येते आणि याच पुणे शहरातील आयटी हब हिंजवडी मधील ३२ कंपन्या गुजरातला जाणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी एकही नवीन आयटी कंपनी आजूबाजूच्या एमआयडीसीत आणलेली नाही. उलट अनेक कंपन्या परराज्यात निघून गेल्या आहेत. टाटा सारख्या इतरही कंपन्या परराज्यात घेऊन जाण्याच्या तयारी हे सत्ताधारी असल्याचा आरोप केला आहे. या सत्ताधाऱ्यांना केवळ गुजरातचा विकास करायचा आहे. असा घणाघात महायुतीवर रोहित पवार यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “गुजरातला ३२ आयटी कंपन्या जाणार आहेत. तीन लाख नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. या सत्ताधाऱ्यांना केवळ गुजरातचा विकास करायचा आहे. या ठिकाणचे टाटा सारखे मोठे प्रकल्प देखील गुजरातला घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.” पुढे ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात एकही आयटी कंपनी नवीन आलेली नाही. उलट अनेक कंपन्या गेल्या आहेत. असा आरोप ही रोहित पवार यांनी केला आहे. पिंपरी- चिंचवड परिसरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मोठमोठ्या कंपन्या आणल्या. शरद पवार यांनी चालना दिली. पुढे ते म्हणाले, सगळ्यात मोठ आयटी पार्क देखील आपल्याच शेजारी आहे. याचा देखील फायदा या शहरातील नागरिकांना झाला. पिंपरी- चिंचवड मध्ये अवघा महाराष्ट्र वसलेला आहे. शहरातील याच नागरिकांना भाजपने दाबण्याचा प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार आणि राजकारण हेच या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केल. रोहित पवार म्हणाले, विरोधकांना त्यांचं साम्राज्य जपायचं आहे. परंतु, तुम्हाला शहराच पूर्वीच वैभव परत आणायच आहे. याकरिता राहुल कलाटे यांना निवडून आणा.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech