इस्त्रोने तयार केला 15 वर्षांचा ‘रोड-मॅप’

0

बंगळुरू- भारतीय अंतराळ सशोधन संस्थेने (इस्त्रो) आगामी 15 वर्षात राबावयाच्या विविध मोहिमांचा रोडमॅप सज्ज ठेवला आहे. इस्त्रोने बनवलेल्या 40 वर्षांच्या कॅलेंडरच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलीय. इस्त्रो आगामी 3 महिन्यात मानवरहित गगनयान मोहिम लाँच करणार आहे. मानवरहित मोहिमेनंतर ‘इस्रो’ गगनयानातून ‘व्योममित्र’ नावाचा मानवसदृश रोबो पाठवणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या(एआय) मदतीने या ‘व्योममित्र’ रोबोचे वर्तन अगदी मानवाप्रमाणे असेल. आगामी 2025 च्या अखेरीस अथवा 2026च्या सुरुवातीस 3 दिवसांच्या पृथ्वी परिक्रमेसाठी 2 भारतीय अंतराळवीर पाठवण्याची ‘इस्रो’ची योजना आहे. येत्या 2029 पर्यंत 3 मानवी मोहिमा अंतराळात राबवल्या जातील.

मोहिमेला प्राप्त यशाच्या आधारावर अंतराळ फेऱ्या आणि अंतराळवीरांची संख्याही वाढवली जाईल. इस्त्रो 2025 मध्ये 6 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. नौदलासाठी जीसॅट-7-आर, लष्करासाठी जीसॅट-7-बी, ब्रॉडबैंड आणि इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी जीसॅट-एन-2 सुरक्षा दले, निमलष्करी दले. रेल्वेसाठी जीसॅट- एन-3, गगनयानासोबत कनेक्टिव्हिटीसाठी 2 उपग्रहही लाँच केले जाणार आहेत. गगनयान या तीन दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीच्या 400 किलोमीटर वरील कक्षेत पाठवले जाईल आणि नंतर सुरक्षितरीत्या समुद्रात उतरवले जाईल. यात यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत असा चौथा देश ठरेल.

इस्रोचे कॅलेंडर 2025 – मनुष्य चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवर परत येणार. 2027 – चांद्रयान-४ मिशन लाँच करणार, चंद्रावरून नमुने आणणार. 2028 – भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल-१ अंतराळात पाठवणार, स्वदेशी यान जोडणी प्रयोगही अंतराळात पार पडेल. अंतराळातच 2 याने परस्परांना जोडली जातील. 2031 – चंद्रावर मानवी मोहीम. 2035 – अंतराळात भारताचे स्थानक उभारणार 2037 – भारतीय रोबो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार. शुक्रावर यान पाठवणार. 2040 – चंद्रावर भारतीय पाऊल उमटवण्याची योजना. नौदल, लष्कर, ब्रॉडबैंड, इन- फ्लाईट कनेक्टिव्हिटी, सुरक्षा दले, निमलष्करी दले. रेल्वेसाठी उपग्रह लाँच होणार .

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech