– लाडकी बहिण योजनेचा घरोघरी प्रचार, मानवी साखळी व सह्यांची मोहिम राबवणार
मुंबई – राज्यभरात ‘अजिंक्य घड्याळ ‘ संवाद बैठका, राष्ट्रवादी काँग्रेसची संघठनात्मक मोर्चेबांधणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राज्यभरात ‘जनसन्मान यात्रा’ सुरू असताना पक्षातील महिला व युवक आघाडीला मजबूत संघठनात्मक बांधणीचा भरगच्च कार्यक्रम आज अजित दादा पवार यांनी दिला. महीला आर्थिक मंडळाच्या सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला व युवक आघाडीचे अधिवेशन आयोजित केले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते. राज्यभरातून महिला जिल्हाध्यक्ष आणि युवक जिल्हाध्यक्षांना या अधिवेशनात निमंत्रित करण्यात आले होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला आघाडीने लाडकी बहिण योजना, मुलींना मोफत शिक्षण, मोफत गॅस सिलींडर योजना, कृषी पंप वीज बील माफी, युवकांना रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम या सारख्या प्रभावी आणि परिणामकारक योजनांचा घरोघरी प्रचार करण्यासाठीचा विशेष कार्यक्रम अजितदादा पविर यांनी दिला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी पन्नास आणि अधिकात अधिक पाचशे महिलांच्या संवाद बैठका घ्यावात असे आदेश अजितदादा पवार यांनी यावेळी दिले. तसेच विशिष्ट दिवशी मानवी साखळी उभारणे, सह्यांची मोहिम राबवणे, सोशल मिडीयात योजनेची माहिती आणि परिणाम दाखवणारे रिल्स बनवणे त्यासाठी विशेष पारितोषिकं देणे या कार्यक्रमाचा समावेश आहे.
युवकांना स्थानिक स्वराज्य संस्था मधे पन्नास टक्के जागा – तटकरे
आगामी विधानसभा निवडणूकांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडमूका पार पडणार आहेत. यानिवडणूकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राज्यभरात पन्नास टक्के जागांवर युवकांना उमेदवारी दिली जाईल. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज दिला. महिला आर्थिक मंडळाच्या सभागृहात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यावेळी खासदार सुनिल तटकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेते अजितदादा पवार हे कायमचं तरूणांना संधी देण्यासाठी आग्रही असतात. आजपर्यंत अजितदादा पक्षसंघठनेत पदाधिकारी नव्हते. मात्र आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे युलकांना निवडणूकांत उमेदवारी देण्यात आपल्या पक्षात कसलीही अडचण नसून उमेदवारी अर्जासाठी आवश्यक असलेल्या एबी फाॅर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझीच सही असते. त्यामुळे युवकांनी कोणतीही चिंता करू नये. असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.