मुंबई ठरली १.४ दशलक्ष ऑर्डर्ससह भारताची व्हेज पिझ्झा राजधानी

0

मुंबईने २०२४ मध्ये स्विगीचा वापर असा केला

मुंबई हे स्वप्नांचे शहर आपल्या प्रचंड ऊर्जा आणि खाद्यपदार्थांच्या अद्वितीय वैविध्यपूर्णतेसाठी ओळखले जाते. इथल्या मरीन ड्राइव्हजवळच्या वडापाव स्टॉल्सपासून ते मोहम्मद अली रोडवरील सुगंधी बिर्यानी हाऊसेसपर्यंत प्रत्येक रस्ता आणि कानाकोपरा खाद्यपदार्थांद्वारे एक वेगळी गोष्ट सांगतो. स्विगी २०२४ मध्ये मुंबईच्या अतिशय जलद जीवनशैलीसाठी एक अत्यावश्यक जोडीदार ठरली आहे.

फेव्हरेट ऑर्डर्स:

● आमची मुंबई चीजशिवाय जगू शकत नाही आणि कदाचित त्यामुळेच १.४ दशलक्ष व्हेज पिझ्झा ऑर्डर्ससह हे शहर देशाचे पिझ्झा राजधानी ठरले आहे. इतकी आवड की एका व्यक्तीने एकाच ऑर्डरमध्ये १९,९६० रूपये इतक्या भल्यामोठ्या रकमेचे ७५ व्हेज पिझ्झा मागवले.

● त्याचबरोबर या गजबलेल्या शहरात नॉनव्हेज स्ट्रिप्स (२.८४ दशलक्ष ऑर्डर्स), चिकन बर्गर (२.५८ दशलक्ष ऑर्डर्स) आणि चिकन फ्राय (२.५४ ऑर्डर्स) या प्रोटीन पॅक्ड पिक्सच्या सर्वाधिक आवडीच्या डिशेस ठरल्या.

मुंबईच्या सर्वाधिक आवडत्या डिशेस:

● चिकन रोल्स, पोटॅटो फ्राइज आणि व्हेज सँडविचेस या गोष्टी वर्षभर मुंबईकरांच्या आवडीच्या ठरल्या आहेत. एका ग्राहकाने एका स्नॅक पार्टीसाठी ६० सँडविचेस एकाच ऑप्डरमध्ये मागवले.

● मुंबईचे यंदाचे सर्वांत मोठे बिल ४५,७२४ रूपये ठरले. त्यात इंडी तंदूरी पनीर पिझ्झा, मेक्सिकन ग्रीन वेव्ह पिझ्झा, मार्गारिटा पिझ्झा, गार्लिक ब्रेडस्टिक्स आणि चीझी डिप हे इटालियन खाद्यपदार्थ चाहत्यांसाठी मेजवानी ठरले!

● ब्रेकफास्टसाठी मुंबईने दाक्षिणात्य खाद्यपदार्थांची आवड जपली. इडली आणि डोसे सर्वांना आवडले तर मेदू वड्यांच्या एकूण संख्येत या शहराने पहिला क्रमांक पटकावला.

● इनकॉग्निटो मोडच्या माध्यमातून ३३४२० छुप्या ऑर्डर्स मागवल्या गेल्या. त्यातल्या जवळपास अर्ध्या ऑर्डर्स (१५७४४) डिनर आणि रात्री उशिरा मागवल्या गेल्या. मुंबई संध्याकाळनंतर आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीबद्दल छुपी असण्याला प्राधान्य देते.

गोड पदार्थांची आवड

● चॉको लाव्हा केक हे पहिल्या क्रमांकाचे सर्वोत्तम डेझर्ट ठरले तर त्यापाठोपाठ बेल्जियम चॉकलेट वॉफल हे दुसऱ्या क्रमांकाचे ठरले. चॉकलेट ट्रफल पेस्ट्री तिसऱ्या क्रमांकावर आली.

● देशाच्या आर्थिक राजधानीला सिताफळ आइसक्रीम खूप आवडते आणि त्यांना जितक्या शक्य तितक्या लवकर आपल्या घरी हवी असते. त्यामुळे सर्वाधिक ऑर्डर करण्यात आलेला बोल्ट पदार्थ म्हणून तिला मान मिळाला आहे.

● मदर्स डेला फ्रूट अँड नट आइस्क्रीमच्या ७२३९ सर्व्हिंग्स मागवल्या गेल्या. त्यातून आईचा गौरव करण्यासाठी आनंदाचा एक स्कूप एक परफेक्ट पद्धत असल्याचे स्पष्ट झाले. देशातील सर्वाधिक केक्सही याच शहरात मागवण्यात आले आहेत.

मुंबई स्टाइलने सेलिब्रेशन:

● अख्खा मुंबई खेलेगा! आयपीएल तसेच टी२० विश्वचषकाच्या वेळी मुंबईने चिकन बर्गरचा पर्याय निवडला. एका ग्राहकाने आयपीएलदरम्यान ४८ बर्गर्स मागवले तर दुसऱ्या एका ग्राहकाने टी२० विश्वचषकादरम्यान ४२ बर्गर्स मागवले.

● दिवाळी आणि दुर्गापूजा हे दोन सण गोड पदार्थांचे दुप्पट सेवन करून अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. मुंबईकरांनी मिल्क केक्स, काजू पिस्ता बर्फी, केसर काजू बर्फी, केसर पिस्ता बर्फी आणि काजू बदाम बर्फी अशा विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेतला.

● गणपती आणि मोदक या दोन्हींचा अन्योन्यसाधारण संबंध आहे. प्रत्येक मुंबईकराला गणेशोत्सवादरम्यान मोदक खायचे असतातच. या वेळी मुंबईकरांनी २,२६,३९३ मोदकांचे बॉक्सेस मागवले तर एका ग्राहकाने एकट्याने फक्त मोदकांवर १२,००० रूपये खर्च केले.

वेग, बचत आणि सुपरहिरोज:

● कपिल कुमार पांडे या स्विगीच्या डिलिव्हरी सुपरहिरोने २०२४ मध्ये तब्बल १०७०३ डिलिव्हरी पूर्ण केल्या आणि मुंबईचे स्पिरिट आपल्या कटिबद्धतेत आहे हे सिद्ध केले.

● मुंबईकरांनी यंदा या वर्षी तब्बल ६०.४७ कोटी रूपयांची बचत केली. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात एका अन्नमहोत्सवाला वित्तपुरवठा करता येईल एवढी ही रक्कम होती. या वेळी २४.५ लाख लोकांना मदत करण्यात आली.

● एका हुशार डायनरने वायकीकी येथून मागवलेल्या ऑर्डरवर तब्बल १,२०,२०५ रूपयांची बचत केली. त्यातून मुंबईला उत्तम अन्न खाणे आणि मोठी बचत करणे या दोन्ही गोष्टी जमतात हे सिद्ध झाले.

चवीचे आणि मौजमजेचे वर्ष: चिकन रोल्सपासून मोदकांपर्यंत आणि रात्री उशिराच्या पिझ्झापासून ते सणांच्या मेजवानीपर्यंत मुंबईने उत्साह, आनंद आणि धमाल या सर्व गोष्टी २०२४ मध्ये केल्या. मागच्या वर्षाबद्दल बोलताना स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य व्यवसाय अधिकारी सिद्धार्थ भकू म्हणाले की, “२०२४ हे वर्ष भारताने स्विगीमार्फत वैविध्यपूर्ण पाककृतींद्वारे साजरे केले. मुंबईच्या नागरिकांनी स्विगीवरून विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. आम्हाला या प्रवासाच्या केंद्रभागी असण्याचा, भारतभरातील लाखो लोकांचे सक्षमीकरण करून ग्राहकांपर्यंत त्यांचे आवडीचे खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी मदत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मध्यरात्रीच्या क्रेव्हिंग्स पूर्ण करण्यापासून ते सुलभतेच्या वचनासह आनंद पोहोचवण्यापर्यंत आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात अद्वितीय खाद्यपदार्थ अनुभव उपलब्ध करून देण्याच्या ‘वन मील वन सेलिब्रेशन एट अ टाइम’ या स्वप्नाने प्रेरित आहोत.”

आता ही धमाल पुढे नेण्यासाठी आम्ही २०२४ पासून भारताचे खाद्यपदार्थांचे ट्रेंड्स तुमच्यासाठी आणले आहेत
● या वर्षी ८३ दशलक्ष बिर्यानी ऑर्डर करण्यात आल्या (प्रति मिनिट १५८ ऑर्डर्स किंवा प्रति सेकंद २ बिर्यानी). त्यामुळे बिर्यानी हा सलग ९ व्या वर्षी देशाच्या अन्न राज्याचा निर्विवाद राजा ठरला आहे.
● चिकनची भरपूर ऑर्डर केल्या गेलेल्या श्रेणीत आपला साधा डोसा शोमध्ये आघाडीवर आहे. डोशाच्या तब्बल २३ दशलक्ष ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत.
● बंगळुरूमधल्या एका ग्राहकाने तब्बल ४९,९०० रूपये पास्ताच्या ऑर्डर्सवर खर्च केले. त्यात ५५ अल्फ्रेडो डिशेस, ४० मॅक अँड चीज आणि ३० स्पॅगेटी प्लेट्स होत्या.
● बोल्ट डिलिव्हरीच्या माध्यमातून सर्वाधिक रसमलाई आणि सिताफळ आइसक्रीमची ऑर्डर दिली गेली. या ऑर्डर्स फक्त १० मिनिटांत पोचत्या केल्या गेल्या.
● आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सनी तब्बल १.९६ अब्ज किलोमीटर अंतर केले. हे अंतर ५३३ हजार वेळा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतला जाऊन येणे आणि चहा पिण्यासाठी थांबून पूर्ण करण्यासारखे आहे.
● याशिवाय आमचे डिलिव्हरी सुपरहिरोज! मुंबईच्या कपिल कुमार पांडे यांनी या वर्षी १०,७०३ ऑर्डर्स डिलिव्हर केल्या तर कोईम्बतूरमधल्या कलीश्वरी एम यांनी महिला पार्टनर्सचे नेतृत्व ६६५८ ऑर्डर्ससह केले.
● भारताने आपल्या गोड पदार्थांची हौस भागवण्यासाठी तब्बल ३.६ अब्ज चॉको लाव्हा केक्स ऑर्डर केले.
● फक्त ३ महिन्यांत ३.५ सिक्रेट ऑर्डर्स इनकॉग्निटो मोडद्वारे करण्यात आल्या.
● विजयवाडा जंक्शनवर सर्वाधिक ऑर्डर्स मागवल्या गेल्या आणि त्यामुळे मोशन सिकनेस विसरण्यासाठी हे सर्वोत्तम स्टेशन ठरले!
● स्विगी डाइनआऊटमध्ये २०२४ मध्ये २२ दशलक्ष ग्राहकांना जागा देण्यात आली. त्यांनी संपूर्ण वर्षभरात ताशी ३३७ टेबल रिझर्वेशन्स/ डील्सपासून १२४२ पर्यंत वाढून त्यात ५३३ कोटी रूपयांची बचत झाली. शहर आपला खाद्यसंस्कृतीचा प्रवास कायम सुरू ठेवत असताना स्विगी २०२५ मध्ये आणखी चविष्ट क्षण देण्यासाठी तयार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech