भारतीय नौदल जहाज तबरचा जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी सराव

0

मुंबई – भारत आणि जर्मन या दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाची फ्रिगेट, INS तबरने 5 ऑगस्ट रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथून परतताना, कील कालव्याजवळ जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी (MPX) द्विपक्षीय नौदल संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. INS तबरने यापूर्वी 17 ते 20 जुलै या कालावधीत, जर्मनीतील हॅम्बर्गला भेट दिली होती.

कील कालव्याजवळ भारतीय नौदल आणि जर्मन नौदल यांच्यातील एमपीएक्सचे आयोजन हे भारतीय नौदलाच्या सर्वदूर पोहोचण्याच्या आणि टिकून राहण्याच्या प्रयत्नांना सूचित करते; तसेच दोन्ही देशांमधील सागरी सहकार्यातील हा महत्त्वपूर्ण मैलाचा टप्पा आहे. जर्मन नौदलाच्या थर्ड स्क्वाड्रन नेव्हल एअर विंग 5 (MFG5) च्या सी लिंक्ससह MPX मध्ये जहाज नियंत्रित दृष्टीकोन, विंचिंग सराव आणि VERTREP मालिका यासारख्या प्रगत सागरी कारवायांचा समावेश होता.

दोन्ही नौदलांच्या तुकड्यांनी उच्च पातळीवरील व्यावसायिकता आणि सहयोगात्मक प्रयत्नांना बळ देण्याप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेचे दर्शन घडविले. भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंध परस्परांची सामायिक मूल्ये, लोकशाही तत्त्वे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी वचनबद्धतेवर आधारित आहेत.

भारतीय नौदल जगभरातील नौदलांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. जर्मन नौदलासह MPX, हा उपक्रम मजबूत द्विपक्षीय नौदल संबंध आणि सागरी सुरक्षा कारवायांमध्ये एकत्र काम करण्याची एकमेकांची क्षमता मजबूत करतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech