१४ वर्षात बोटावर मोजण्याइतके चित्रपट हिट

0

मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या ‘दबंग’ सिनेमामधून २०१० साली बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. २ जून २०२४ रोजी सोनाक्षी तिचा ३७वा वाढदिवस साजरा करते आहे. अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दीर्घकाळापासून आहे, मात्र तिने या कालावधीत तिच्या नावावर असणाऱ्या हिटची संख्या तशी कमी आहे. अभिनेत्रीने शत्रुघ्न सिन्हा यांची लेक म्हणून इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली होती, मात्र आज तिची अशी स्वत:ची ओळख आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज ‘हीरामंडी’मध्ये तिने फरिदन या पात्राद्वारे प्रेक्षकांना मोहिनी घातली. आज अभिनेत्रीच्या वाढदिवशी जाणून घ्या नेमका तिच्या करिअरचा आलेख कसा होता…

 

सोनाक्षी सिन्हाने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होते की, जेव्हा तिचा डेब्यू सिनेमा आला त्यावेळी तिचे वजन ९५ किलो होते. नंतर अभिनेत्रीने ३० किलो वजन कमी केले आणि शूटिंगला सुरुवात केली. सोनाक्षी सिन्हाने ‘दबंग’, ‘रावडी राठोड’, ‘जोकर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग २’, ‘लुटेरा’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘बुलेट राजा’, ‘आर. राजकुमार’, ‘हॉलिडे’, ‘ॲक्शन जॅक्सन’, ‘तेवर’, ‘अकिरा’, ‘नूर’, ‘फोर्स २’, ‘इत्तेफाक’, ‘न्यूयॉर्क’, ‘हॅपी फिर भाग जायगी’, ‘कलंक’,’ ‘खानदानी शफाखाना’, ‘मिशन मंगल’, ‘दबंग ३’, ‘भुज – प्राइड ऑफ इंडिया’, ‘डबल एक्सएल’ सारखे चित्रपट केले आहे

त.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech