अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना भारतात परत आणणार

0

परराष्ट्र प्रवक्ते जयस्वाल यांनी स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली : अमेरिकेतील बेकायेशीर स्थलांतरितांच्या समर्थनात भारत उभा राहणार नाही. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज, शुक्रवारी सांगितले. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अमेरिका आणि इतरत्र निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सरकार परत आणण्यासाठी पावले उचलेल. त्यासाठी सर्व नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. भारत बेकायदेशीर स्थलांतराच्या विरोधात आहे कारण ते संघटित गुन्हेगारीशी जोडलेले आहे. भारत-अमेरिका संबंध खूप मजबूत आणि बहुआयामी आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही खूप चांगले आहेत.

दोन्ही देशांनी व्यापाराशी संबंधित कोणत्याही बाबींवर चर्चा करण्यासाठी यंत्रणा स्थापित केल्या आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील चर्चेनुसार सुमारे 18 हजार भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवले जाऊ शकते. दरम्यान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री 26-27 जानेवारी रोजी चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव चीनमध्ये द्विपक्षीय हिताच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील असे जयस्वाल यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech