मुरबाडमध्ये अवैध दगडखाणीवर स्फोटकांची आतिषबाजी

0

हादरे भुकंपाचे कि स्फोटकांचे नागरिक संभ्रमात, माळशेज हायवे वरून रोजच शेकडो डंपरातुर अवैद्य रेतीची वाहतुक

मुरबाड : भिमाशंकर, कळसुबाई, हरिचंद्रगड ह्या तीन अभयारण्याच्या हद्दित मुरबाड तालुक्याती शेकडो हेक्टर भूभाग येतो, वनविभागाच्या आणि औद्योगिक विकास महामंडळाचे जागेत नदीपात्रात गौण खनिज माफियांनी बिनबोभाट पणे अवैध दगडखाणी सुरु केल्या आहेत, तेथे दगड काढण्यासाठी एक प्रकारे स्फोटकांची आतिषबाजी होत असताना या आतिषबाजीमुळे कानठळ्या बसणाऱ्या आवाजमुळे जंगली श्वापदे येथून परांगदा झाली आहेत, काही घरांना तडे जात असल्याने सध्या तालुक्यातील काही गावाना भुकंपाचे धक्के बसत असल्याने हे देखील भुंकपाचे धक्के आहेत काय ? या संभ्रमात नागरिक असुन सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील शहरी औद्योगिक व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असुन या बांधकामाना लागणारे खडी, डबर, रेती, माती माळशेज घाट मार्गे जून्नर ओतुर वरून रोजच पहाटे-पहाटे ते संध्याकाळच्या सुमास डंपरमधुन रेतीची वाहतुक होते, या घाटरस्त्यावर पोलिस चौक्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वाटमारी चौक्या व महसुलविभागाची चार तलाठी कार्यालये असून ही ह्या रेतीच्या अवैध वाहतुकीवर कार्रवाई होत नाही, अवैध मार्गाने येणाऱ्या या रेती शासनाची कोणत्याही प्रकारे राँयल्टी न भरता बिनबोभाटपणे वापरली जातेय.

बांधकामांना लागणारे गौण खनिज हे कुठुन येते याकडे महसुल विभाग डोळेझाक करत असल्यामुळे या गौण खनिज माफियांचे मोठे फावले आहे. त्यामुळे या माफियांनी बिनधास्तपणे मुरबाड शहरानजिक असणाऱ्या म्हाडा वसाहत. औद्योगिक क्षेत्र तसेच बारवी नदीचे पात्रात व म्हसा धसई, टोकावडे, शिरोशी, शिवळे, माल्हेड, सायले, म्हाडस, नढई, टेंभरे या ठिकाणी असणाऱ्या वनविभागाच्या जागेत तसेच औद्योगिक विकास महामंडळाचे जागेत खूलेआम दगडखाणी सुरु केल्यामुळे या दगड खाणीतून दररोज हजारो ब्रास गौण खनिज काढले जाते. हे दगड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वपर केला जात असुन हि स्फोटके येतात कुठुन ती कोठे साठवली जातात.

हि स्फोटके स्टोन क्रेशर धारकांना वापरण्याची मुभा असताना तालुक्यातील एकाही स्टोन क्रेशर धारकाने शासनाचे अटीची पुर्तता केलेली नसल्याचे महसूल विभागाचे सुत्राकडुन समजते. शासनाचे आदेशानुसार दगडखाणीवर स्फोट घडवून आणणारा इसम हा प्रशिक्षित असावा व त्याच्याकडे प्रशिक्षित असल्याचे प्रमाणपत्र असावे. परंतु मुरबाड तालुक्यातील शेकडो दगड खाणीवर स्फोट करणारे हे परप्रांतीय असुन ते प्रशिक्षित आहेत की नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी. शिवाय महसुल प्रशासन कामकाज आणि पोलीस यंत्रणाचे कार्य मात्र गुलदस्त्यातच आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech