जालना : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यावेळी बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठा समाज जेवढा समजूतदार तेवढाच आक्रमक आहे. कोणीही सत्तेत आले तरी आरक्षणासाठी लढाई करावी लागणार आहे. आम्हाला आमच्या लेकरांना अधिकारी करायचे आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही उपोषण कधी करणार ते जाहीर करू, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. लाडक्या बहिणींना पैसे दिले. मात्र अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा नुकसान भरपाई मागावी लागणार. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास गावागावांतील मराठे सरकारमधील लोकांना जाब विचारू.