ससुन डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक…….!

0

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : अनंत नलावडे
ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काम करणा-या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

बंदरे विकास मंत्री राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून अधिकारी,कर्मचारी व मत्सव्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, आज अचानक ससून डॉकची अधिकाऱ्यानं समवेत भेट देवून आपण तेथील सध्या असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.त्यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाची इमारत,ससून डॉकमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ करावीत,परिसरात अत्यावश्यक असणारी कामे गतीने करावीत तसेच ससून डॉक परिसरात कार्यरत सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे याबाबतही मत्स्यव्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सक्त सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे राणे यांनी सांगितले.

ससून डॉक हे सर्वात जुने बंदर असून, मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासळी बाजार आहे.तसेच ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवाना धारक नौका, मच्छिमारी सहकारी संस्थाशीत गृह, ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी -सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था, मासे लिलावासाठी शेड उभारणी, नवीन धक्का दुरूस्तीकरण ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचेही निर्देश देतानाच स्वच्छता गृहांची उभारणी करण्यासह मत्स्य व्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी विभागाकडून राबविण्यात येणा-या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्याची माहितीही राणे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार,मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यासह मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर, मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय अधिकारी पुलकेश कदम,ससून डॉकचे कार्यकारी अभियंता व प्रशासक दीपक पवार यासह अधिकारी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech