मुंबर्ई : तुम्हाला चॉकलेट खायला आवडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता चॉकलेट महागणार आहे. कारण चॉकलेट बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या कोको बीन्सच्या किमती वाढणार आहेत, त्यामुळे चॉकलेटच्या किमती वाढू शकतात. भारतात कोको बीन्सची किंमत सुमारे १५०-२५० रुपये प्रति किलो आहे जी ८०० रुपयांपर्यंत वाढली आहे.
केवळ चॉकलेट निर्मातेच नव्हे तर अमूल, आइस्क्रीम ब्रँड बास्किन रॉबिन्स आणि अगदी स्रॅक निर्माते आणि इतर कंपन्यांवरही कोकोच्या वाढत्या किमतींचा परिणाम होणार आहे. अमूल ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे एमडी जयेन मेहता यांनी सांगितले की, अमूल आपल्या चॉकलेट्सच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढविण्याचा विचार करत आहे.