केळकरांच्या झंझावात प्रभात फेरीला प्रचंड प्रतिसाद

0

ठाणे : ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय मुकुंद केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात आता प्रभाग क्रमांक ११ येथे येऊन धडकल्यानंतर ठिकठिकाणी महिला वर्गाने केळकर यांचे औक्षण केले.तर, ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकरांची भेट घेत, तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला. यावेळी आपला माणूस, हक्काचा माणूस, जय जय श्री राम, जय शिवराय … अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला बुधवारी सायंकाळी 5 वाजता जगमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे केळकर विजयाची वाटचाल करत असल्याचे दिसून आले.

ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 11 येथून काढलेली प्रचार फेरीची सुरुवात कोलबाड जागमाता मंदिर येथून झाली. पुढे कोलबाड नाका, सुमेर कॅसेल सोसायटी, विकास कॉम्प्लेक्स सोसायटी, महावीर माईल स्टोन ,आदर्श नगर सोसायटी ,शेलार पाडा, राजश्री टॉवर, कॉसमॉस तबेला, प्रताप टॉकीज, गणपती विला गणेश विला *टीजेएसबी बँक खोपट नाका, गोकुळदास वाडी, खोपट शिवसेना शाखा, फ्लॉवर वेली फागे वाडी मार्गे सर्विस रोडने नारळीपाडा येथून दत्त मंदिर मार्गे रुणवाल नगर ए / बी प्लॉट, नीलकंठ दर्शन, सिद्धिविनायक टॉवर, शाहू नगर , गोल्डन पार्क सोसायटी, बमुक्ताईनगर, गोपाळ बाग, शांतीबन सोसायटी , आझाद नगर नंबर एक, कॅसलमेल सर्कल, साई आनंद प्लाझा सोसायटी, नवनीत भरत सोसायटी ,रॉयल सोसायटी ,आझाद नगर नंबर 2, गोकुळ नगर ,आई जरी मरी देवी मंदिर, माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांचे कार्यालय गोकुळ नगर जवळ या फेरीचा समारोप झाला.

यावेळी मतदारांना केले. या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील, नारायण पवार, नंदा पाटील, दीपा गावंड, आर पी आयचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस सचिन पाटील, प्रशांत गावंड, दीपक जाधव, सचिन भोसले, महेश कदम, बाबू राऊळ, युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सुरज दळवी, अमित जयसवाल, शिवसेना उपशहर प्रमुख सौ. दाते, समीरा भारती, दिलीप कंकाळे, मिलिंद साटम, शैलेश रेवाळे, भाविका चोंणकर, हर्षला रेवाळे, आणि शिवसेना शाखा प्रमुख, पदाधिकारी- कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech