कोळी-कोरी बांधवांचा होळी महोत्सव मोठया आनंदात, उत्साहात साजरा

0

ठाणे – फाल्गुन शुक्ल पंचमीला कोकणासह, मुंबई, रायगड, ठाणे जिल्हयात साजरा केला जाणारा शिमगोत्सव! होळी हा पुरण पोळीचा सण असतो. महाराष्ट्रात होळीनिमित्त घरोघरी पुरणपोळी बनवली जाते आणि होळीला सुद्धा पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. याच पुरणपोळीचा गोडवाप्रमाणे संपूर्ण कोळी-कोरी समाजात सुद्धा मोठया आनंदाने पुरण पोळीसह शिमगोत्सव, होळी सण साजरा केला जातोय…

आपण जाणून घेऊया कोळी-कोरी समाजातील शब्दाच्या फरकातील अंतर मुळात देशभरात कोळी समाज मोठया प्रमाणात देशभर विखुरलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशात महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसह हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीरसारख्या राज्यात देखील कोळी समाज मोठया प्रमाणात वास्तव्याला आहे. कोळी समाजाला गुजरात आणि मध्य प्रदेशात कोळी-कोरी समाज म्हणून ओळखल्या जातो. ज्याप्रमाणे महाराष्ट्रासह मुंबई व ठाण्याच्या समुद्रकिनारी कोळी- कोरी समाज वास्तव्याला आहे.

ठाण्यासारख्या शहरी भागात जिथे मोठया प्रमाणात कोळी समाजाची वस्ती आहे, अशा या चेंदणी कोळीवाडयात ३० मार्च रोजी श्री.आनंद भारती महाराजांच्या सानिध्यात कोळी-कोरी समाज बांधवांचा होळी उत्सव २०२४ मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी दिप प्रज्वल व प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. या कार्यक्रमात प्रमुख व विशेष पाहुण्यांचा मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात कोळी-कोरी बांधव उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे केदारभाई लखेपुरीया-अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,  डॉ हरीश कोरी – उपाध्यक्ष  भारतीय कोळी समाज, एस के प्रसाद-मुंबई कोली समाज अध्यक्ष, चेतराम कोली- निवृत्त इॅन्कमटॅक्स कमिशनर मुंबई, डॉ शिवकुमार कोरी़- एमबीबीएस मुंबई, डॉ रोहित शंकवार, एमबीबीएस-एमडी मुंबई, जितेंद्र गाढवे, राष्ट्रीय सल्लागार अखिल भारतीय कोळी समाज, दिनेशजी कोळी, उपाध्यक्ष महाराष्ट्र, अजिंक्य पाटील, युवा सरचिटणीस, प्रफुल नाखवा, ठाणे शहर अध्यक्ष, आनंद कोळी- ठाणे शहर उपाध्यक्ष, सोनू खेरौलिया, सचिन पबिया, जयवन्त नारौलिया, हरीशचंद्र नारोलिया- अध्यक्ष कोरी समाज, उपाध्यक्ष  राजेंद्र कोरी आदी मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech