आयपीएल २०२४ : सर्वाधिक मोठा धावांचा डोंगर

0

लखनौ : पंजाबकिंग्सचे स्टार फलंदाज अपयशी ठरलेले असताना त्यांनी विजयाच्या आशा सोडल्या होत्या. पण, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा ( इम्पॅक्ट खेळाडू) या युवकांनी गुजरात टायटन्सच्या पोटात गोळा आणला. या दोघांनी २२ चेंडूंत मॅचविनिंग ४३ धावांची स्फोटक भागीदारी केली. शशांकने अर्धशतक झळकावून विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर आशुतोषने ३१ धावांची वादळी खेळी केली. आयपीएल २०२४ मधील हा सर्वाधिक मोठा धावांचा यशस्वी पाठलाग ठरला.

कर्णधार शुबमन गिलने गुजरात टायटन्सला धावांचा डोंगर उभारून दिला. केन विलियम्सनने ( २६) चांगला खेळ केला. साई सुदर्शनने १९ चेंडूंत ६ चौकारांसह ३३ धावा चोपून वेग वाढवला. राहुल तेवाटीयाने ८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २३ धावा केल्या. गुजरातने ४ बाद १९९ धावा उभ्या केल्या. शुबमन ४८ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारासह ८९ धावांवर नाबाद राहिला. उमेश यादवने दुस-या षटकात शिखर धवनचा ( १) त्रिफळा उडवून मोठा धक्का दिला. जॉनी बेअरस्टो व प्रभसिमरन सिंग यांनी चांगले फटके खेचले. नूर अहमदने त्याच्या पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोचा ( २२) त्रिफळा उडवला.

नूर अहमदने पंजाबला आणखी एक मोठा धक्का देताना प्रभसिरमला ( ३५) माघारी जाण्यास भाग पाडले. अझमतुल्लाह उमरजाईनेही पंजाबच्या सॅम कुरनला ( ५) स्वस्तात बाद केल्याने त्यांची अवस्था ४ बाद ७० अशी केली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्याने आता सिकंदर रजा व शशांक सिंग यांच्यावर त्यांची भिस्त होती. गुजरातने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून अनुभवी मोहित शर्माला गोलंदाजीला आणले आणि त्याने सिकंदरला ( १५) बाद केले. या विकेटनंतर मोहितने पर्पल कॅप नावावर केली. ६ षटकांत ६९ धावा ढइङर ला हव्या होत्या आणि शशांक व जितेश शर्मा याच्यावर त्यांच्या आशा होत्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech