‘ गद्दार’ ‘ खोके ‘ अशी अवहेलना सहन करूनही लोकहिताच्या कामांमध्ये तुम्ही कधीही व्यत्यय येऊ दिला नाही

0

कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघात हा ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे शहरात येतो. हा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असून इथले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आहेत. तर, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: कोपरी पाचपखाडीचे आमदार आहेत. या मतदारसंघात ठाणे महापालिकेच्या दोन प्रभागांचा समावेश होतो. याच मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मताने विजयी झाले. यावेळी खासदार नरेश मस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेढा भरवत स्वागत केले. यावेळी बोलतांना मस्के म्हणाले साहेब आम्हाला अत्यत अभिमानाने सागावेशे वाटते की, गेली अडीच वर्ष अव्याहत, अथकपणे तुम्ही केलेल्या प्रामाणिक कामाची ही पावती जनतेने मतांमधून दिली आहे. ‘ गद्दार’ ‘ खोके ‘ अशी अवहेलना सहन करूनही लोकहिताच्या कामांमध्ये तुम्ही कधीही व्यत्यय येऊ दिला नाही. “#कर्मण्येवाधिकारस्ते” या न्यायाने अखंड काम करत राहिलात. #बहिणी, #भाऊ, #शेतकरी, #गरीब, #ज्येष्ठ या साऱ्यांचा विचार करत त्यांच्यासाठी #योजना तयार करून त्या #कार्यान्वित करत राहिलात. जनता दूधखुळी नाही. त्यांनी नीर-क्षीर विवेक केला आहे आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा #हिंदुत्ववादी #प्रामाणिक आणि #गतिमान #सरकार आकार घेत आहे. खूप खूप अभिनंदन केलेत…

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech