ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान

0

ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आवाहन

ठाणे – ठाणे ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात मंगळवार, दि. १३ ऑगस्ट ते गुरुवार, १५ ऑगस्ट यादरम्यान ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे.

केंद्र शासनाने २०२२ सालापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. जिल्ह्यात शुक्रवार, दि. ९ ते दि. १५ ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी हे अभियान साजरा करण्यात येईल, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) प्रमोद काळे यांनी दिली आहे.

मागील दोन्ही वर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यासाठी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे.

संकल्पना काय? :  ठाणे जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत यानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, त्यानिमित्ताने ग्रामस्थानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech