हमासचा इस्रायलवर पुन्हा हल्ला तेल अवीववर डागली क्षेपणास्त्रे

0

जेरूसलेम – हमासने पुन्हा एकदा इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हमासने इस्रायलची राजधानी तेल अवीववर अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. हमासच्या अल कासिम ब्रिगेडने हा दावा केला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये सायरन ऐकू आले.

अल कासिम ब्रिगेडने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक निवेदन जारी केले आहे की, हा हल्ला ज्यूंनी केलेल्या नरसंहाराला प्रत्युत्तर म्हणून केला होता.हमासच्या अल-अक्सा टीव्हीने गाझा पट्टीतून तेल अवीववर अनेक रॉकेट डागल्याची पुष्टी केली.गेल्या चार महिन्यांतील तेल अवीववर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला असून, त्यामुळे राजधानी तेल अवीवमध्ये सायरनचे आवाज ऐकू आले.मात्र, हमासच्या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. इस्रायलच्या इतर शहरांमध्येही सायरनचे आवाज ऐकू आले. इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले की,गाझामधील रफातून मध्य इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यात आली. दक्षिण इस्रायलमधून गाझापर्यंत मदत सामग्री घेऊन जाणाऱ्या ट्रकला मान्यता देण्यात आली असताना हा हल्ला झाला. नव्या करारानुसार या मदत सामग्रीच्या ट्रकना गाझामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता हमासच्या हल्ल्यानंतर हा नवा करारही अडचणीत येऊ शकतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech