मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा

0

कळवा : कळवा विभागातील दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन माजी. विरोधी पक्ष नेत्या श्रीमती प्रमिलाताई मुकुंद केणी आणि मंदार मुकुंद केणी यांच्या मार्गदर्शनाखाली 25 डिसेंबर रोजी नाताळ च्या निमित्ताने घेण्यात आले यंदाचे 15 वर्ष असून या स्पर्धेमध्ये लहान शिशु ते 10 वीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल कळवा येथे घेण्यात आले कळवा विटावा खारीगाव परिसरातील 850 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी विविध विषय देण्यात आले होते या चित्रकला स्पर्धेसाठी मान्यवर राष्ट्रवादी शरद पवार गट ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई ठाणे शहर उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उपस्थिती दर्शवली

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech