बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्यांवर शासनाकडून कठोर कारवाई – गृहराज्यमंत्री योगेश कदम

0

नाशिक : बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्यांना कधीही गय केली जाणार नाही असे स्पष्ट करून राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, बांगलादेशी नागरिकांना कागदपत्री पुरावे मिळण्यासाठी कलकत्ता मधूनच मदत होते. त्यामुळे त्यांना भारतात वास्तव करण्याची संधी मिळते असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. राज्याचे महसूल आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावरती आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, बांगलादेशी नागरिक हे देशाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून धोका नायक आहे आणि महायुती सरकारचा या धोक्याच्या दृष्टिकोनातून पावला उचलणे सुरू झालेले आहेत. राज्यातील महायुतीचे सरकार हे कदापीही सहन करणार नाही असे स्पष्ट करून मालेगाव मधील प्रकरणांमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे आणि अशा बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची शासन गय करणार नाही, असा इशारा देखील दिला आहे.

राज्यातील तहसीलदार व इतर सह वर्गातील अधिकाऱ्यांनी जन्म दाखले देण्याच्या प्रक्रियेला विरोध केला असून त्या प्रकरणात हा अधिकार काढून घेण्याची मागणी केली आहे त्यावर अजून पर्यंत शासनापर्यंत हे निवेदन आलं नसुन ते मिळाले तर योग्य विचार केला जाईल, असं सांगुन ते पुढे म्हणाले की, महसूल विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी म्हणून शासन सर्व स्तरावरचे प्रयत्न करीत असून त्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री बदलण्याच्या प्रश्नावर बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, राज्यामध्ये महायुतीचे सरकार भक्कम आहे वैचारिक मतभेद देखील नाही जे काही वाद आहेत ते अपेक्षेचे आहेत आणि अपेक्षा व्यक्त करणे यामध्ये कोणतीही चूक नाही. रत्नागिरीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर या ठिकाणी शिवसेनेचे तीन भाजपाचे एक आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे या तत्त्वाप्रमाणे राष्ट्रवादीला गेलेलं पालकमंत्री पद हे शिवसेनेने अपेक्षा करून घेतलं तर काय वाईट आहे भरत गोगावले हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही ही मागणी करत असल्याचे स्पष्ट करून नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत मात्र, त्यांनी सोयीस्कर मौन बाळताना सुख सांगितले की याबाबत वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील.

राज्यामध्ये अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारी येण्याचे प्रमाण वाढत आहेत ही बाब चिंताजनक असून आता राज्य सरकार त्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करत आहेत अशा मुलांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी काही कॅम्पेन राबवता येईल का या दृष्टिकोनातूनही विचार करत असल्याचे सांगून राज्यामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी अजून काही विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग करीत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक पोलीस आयुक्तालयाचे केले कौतुक पोलीस आयुक्तालयाच्या कारभाराबाबत बोलताना त्यांनी कौतुक केले.

नाशिक पोलीस आयुक्तालयाचा कामकाज हे अतिशय चांगले चालू आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, आत्तापर्यंत सोनसाखळी चोरीच्या प्रकरणात अतिशय समाधानकारक कारवाई आहे. अमली पदार्थ विक्री आणि सेवन प्रकरणांमध्ये अजून अडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत असे सांगून कदम पुढे म्हणाले की, नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विस्तार करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव पाठवला गेला आहे. यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र, मालेगाव पोलीस आयुक्तालय व्हावं असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि तो विचाराधीन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech