पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वैयक्तिक ईमेल काही काळासाठी हॅक झाला झाल्याने गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांचा जीमेल आयडी यूट्यूब आणि इतर सोशल मीडियाशी लिंक आहे. परंतु, आता तो यशस्वीपणे रिस्टोअर करण्यात आलाय. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 19 नोव्हेंबरच्या रात्री मुख्यमंत्र्यांचा ई-मेल हॅक झाल्यामुळे जीमेल अकाउंटचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि 4 ते 5 तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक जीमेल आयडी रिस्टोअर करण्यात आला. हॅकरचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.