ठाणे – येत्या ऑगस्टमध्ये होवून घातलेल्या कोळी बांधवांचा उत्सव नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी अखिल भारतीय कोळी समाज संघटनेची येत्या ८ जूनला सर्वसाधारण सभेचे आयोजन चेंदणी कोळीवाडा कोळी समाज सिडको हाँल, बस डेपो, चेदंणी-कोळीवाडा ठाणे येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व कमिटी पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतक यांनी शनिवार दिनांक ०८ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या, विशेष सर्वसाधारण सभेत सर्वांनी आर्वजून उपस्थित राहावे अशी माहिती यावेळी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने असल्याची माहिती युवा सरचिटणीस – महाराष्ट्र प्रदेश, अजिंक्य दिपक पाटील यांनी दिली आहे.