मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने एच-१बी व्हिसाचे नियम केले शिथिल

0

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने जाता-जाता एच-१ बी व्हिसाचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला. ज्या अंतर्गत अमेरिकन कंपन्यांना विशेष कौशल्य असलेल्या परदेशी नागरिकांना कामावर घेणं सोपं होणार असल्याची माहिती आहे. नव्या नियमांच्या अनुसार अमेरिकन कंपन्यांना विदेशातून तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांमधील तज्ञांच्या अमेरिकेत नोकरी देण्यासाठी कमी कठोर अटींची पूर्तता करावी लागणार. नियमांमध्ये शिथीलता आणण्यात आल्याने व्हिसा मिळविणे अधिक सुलभ होणार. प्रतिवर्षी भारतातून अमेरिकेत या व्हिसावर 50 ते 60 हजार तंत्रज्ञांना आणि उच्चशिक्षितांना जाता येणार आहे. हा बिगर स्थलांतर व्हिसा आहे. या व्हिसा व्यवस्थेमुळे अमेरिकेच्या कंपन्यांनाही जगभरातील उच्चशिक्षितांच्या प्रतिभेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक वर्षी असे दोन लाखाच्या आसपास व्हिसा वितरीत होतात. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी F-1 व्हिसा सहज H-1B मध्ये बदलता येणार या निर्णयामुळे हजारो भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिकांना फायदा होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांची माहिती आहे.

या व्हिसाच्या मर्यादांमध्ये सूट देण्यात येत आहे, असे गृहमंत्रालयाने म्हटले. एफ-१ व्हिसाधारक विद्यार्थ्यांना आपला व्हिसा एच-१ बी मध्ये रूपांतरित करून मिळेलच; पण त्याबरोबरच ज्यांच्या एच-१ बी व्हिसाला मंजुरी मिळालेली आहे, त्यांची प्रक्रिया पार पाडण्यातही गतिमानता येईल. अमेरिकेत सध्या सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या प्रशासनाने भारतासाठी एक समाधानकारक पाऊल उचलले आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील. एच-१ बी व्हिसाचे नियम शिथिल करण्याची घोषणा अमेरिकी गृहमंत्रालयाने मंगळवारी केली आहे. या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech