बहीरम यात्रेत आजी माजी आमदारांचा पहिल्यांदाच दोन शंकर पट

0

अमरावती : बहिरम यात्रेला शंकरपटाचा इतिहास आहे. अलीकडच्या काळात बच्चू कडू यांनी शंकरपट सुरू केला. यादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या अचलपूर विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून प्रवीण तायडे निवडून आले. त्यांनीही बहिरममध्ये यंदा यात्रे दरम्यान शंकरपट आयोजित केला, आहे. यामुळे बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शंकरपट होत आहेत. आ. प्रवीण तायडे यांनी आयोजित केलेला शंकरपट ८ ते १० जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून, ११ लाखांच्या बक्षिसांची लयलूट त्यांनी ठेवली आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून २१ ते २३ जानेवारीला शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. या शंकरपटात दहा लाख रुपये बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. या दोन्ही शंकरपटांना जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. हे दोन्ही शंकरपट एकाच जागेवर आयोजित आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech