टोकियो टेक इव्हेंटमध्ये प्रथमच फ्लाईंग कारचे पायलटसह उड्डाण

0

टोकियो – टोकियो शहरातील कोटो वॉर्डमधील टोकियो बिग साईट कन्व्हेन्शन सेंटर येथे आंतरराष्ट्रीय टेक इव्हेंटमध्ये प्रथमच दाखल केलेल्या फ्लाईंग कारने पायलटसह १० मीटरपर्यंत उड्डाण केले. ‘हेक्सा’ असे या कारचे नाव आहे. ही कार अमेरिकन कंपनी लिफ्ट एअरक्राफ्ट इंकने विकसित केली आहे.

ही कार ४.५ मीटर रुंद, २.६ मीटर उंच आणि १९६ किलोग्रॅम वजनाचे आहे. ही सिंगल सीट कार आहे, जी जमीन आणि पाणी दोन्हीवर उतरू शकते. सध्या भारतातही महिंद्रा आणि मारुती सुझुकीसह तीन कंपन्या इलेक्ट्रिक फ्लाइंग कारवर काम करत आहेत. चिनी कंपनी एक्सपेंग आणि ह्युंदाईची प्रगत एअर मोबिलिटी कंपनी सुपरनलने जानेवारीमध्ये अमेरिकेच्या लास वेगास येथे आयोजित वर्षातील सर्वात मोठ्या टेक इव्हेंट, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (२००४) मध्ये त्यांच्या फ्लाइंग कारचे प्रदर्शन केले होते. याशिवाय स्काय ड्राइव्ह इंक., पाल-व्ही लिबर्टी आणि नेक्स्ट फ्यूचर आस्का देखील त्यांच्या फ्लाइंग कार विकसित करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech