‘सुभेदार’ सिनेमाची पहिली झलक भेटीला

0

मुंबई : अनिल कपूर यांच्या ‘सुभेदार’ सिनेमाची पहिली झलक भेटीला आली आहे.अनिल कपूर या चित्रपटात एक वेगळ्या आणि नव्या अंदाजात दिसणार आहेत. या व्हिडीओत दिसून येतं की, अनिल कपूर बंद दाराआड बसलेले असतात. त्यांच्या दरवाजावर माणसं ठोठावर असतात. “ये म्हाताऱ्या दार उघड.. आतमध्ये लपून बसलाय..” अशा शब्दात काही माणसं दारावर जोरात थपडा मारत असतात. पुढे अनिल कपूर यांच्या लूकची झलक दिसते. त्यांच्या हातात बंदूक असते आणि चेहऱ्यावर रागीट भाव असतात. शेवटी “फौजी तयार..!” असं वाक्य येऊन हा व्हिडीओ संपतो. त्यामुळे आता या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेणे उत्कंठाचे ठरणार आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत कायम वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

अनिल कपूर हे आज मंगळवार 24 डिसेंबर रोजी 68 वर्षांचे झाले आहेत. प्राइम व्हिडिओने हा खास प्रसंग चाहत्यांसाठी अधिक खास बनवला आहे. वास्तविक, OTT प्लॅटफॉर्मने ‘सुभेदार’ चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे.हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सध्या रिलीजची तारीख समोर आलेली नाही. चाहते ती लवकरच जाहीर करणार आहेत.ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे.त्याच्यासोबत राधिका मदन त्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अनिल कपूर यांनी वयाची साठी ओलांडली असली तरीही त्यांची एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे.अशातच अभिनेत्याच्या आगामी ‘सुभेदार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.ही झलक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech