कोस्टल रोडवर पहिला अपघात

0

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर आज कारचा अपघात झाला. कोस्टल रोड बोगद्यात गुरुवारी दुपारी हा अपघात घडला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्यात काही काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. दरम्यान, अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोस्टल रोडच्या निर्मितीनंतर हा पहिलाच अपघात झाला असल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. मात्र अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी कॉल बॉक्स मधून एका व्यक्तीने कॉल केला की सीपी-५ जवळ बोगद्यामध्ये कार अपघात झाला आहे. लोकल ऑपरेशन मेंटेनन्स रूमने सीसीटीव्ही कॅमे-यातील घटना तात्काळ तपासली आणि संबंधित विभागाला माहिती दिली. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा कार धडकल्याचे पहायला मिळाले. यात धडकेमुळे कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मार्शलसह बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच टोइंग व्हॅनही बोलवण्यात आली. मार्शल्सने वाहतुकीवर नियंत्रित मिळवण्याचे काम केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech