दुसऱ्या टप्प्यासाठी अंतिम यादी तयार

0

मुंबई – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली आहे. आठ मतदारसंघांत एकूण २० उमेदवार रिंगणात असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी दिली आहे. तर, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या राजकीय बैठकीची दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज अंतिम करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यातील पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ २०३ उमेदवार आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात उरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात पात्र उमेदवार पंचवीस होते. त्यामधील चार उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता २१ उमेदवार रिंगणात आहेत. अकोला मतदारसंघामध्ये पात्र उमेदवार सतरा होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता पंधरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ५६ उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ३६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ उमेदवार होते, त्यापैकी २ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २४ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हिंगोली मतदारसंघात ४८ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी १५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३३ उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात ६६ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी तब्बल ४३ उमेदवारांनी माघार घेतल्याने फक्त २३ उमेदवार रिंगणात आहेत. परभणीत ४१ उमेदवार पात्र झाले होते त्यापैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता ३४ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech