नागपूर : राज्यात महायुती सरकारला मिळालेल्या बहुमतानंतर शपथविधी सोहळा मोठया थाटात संपन्न झाला. त्यानंतर राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन घेण्यात आले. तेवढयावर न थांबता नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला मात्र, ८ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर मंत्रीमंडळ खाते वाटप गोंधळ चालूच होता. अखेर आज मंत्री मंडळ खातेवाटपाचा गोंधळ सुटल्याने खातेवाटीचा यादी जाहीर झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी ५ डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर १५ डिसेंबरला ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले असल्याची सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे तर शपथविधीनंतर कोणते खाते मिळणार याची धास्ती लागलेल्या मंत्र्यांना समाधान लाभले.
अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे.
कॅबिनेट मंत्री
१) चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
२) राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
३) हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
४) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
५) गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास)
६) गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
७) गणेश नाईक – वन
८) दादाजी भुसे – शालेय शिक्षण
९) संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
१०) धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
११) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
१२) उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
१३) जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
१४) पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
१५) अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
१६) अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
१७) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
१८) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
१९) दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
२०) अदिती तटकरे – महिला व बालविकास
२१) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
२२) माणिकराव कोकाटे – कृषी
२३) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
२४) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
२५) संजय सावकारे – कापड
२६) संजय शिरसाट – सामाजिक न्याय
२७) प्रताप सरनाईक – वाहतूक
२८) भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
२९) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
३०) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
३१) आकाश फुंडकर – कामगार
३२) बाबासाहेब पाटील – सहकार
३३) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
३४) माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
३५) आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
३६) मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
३७) इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
३८) योगेश कदम – गृहराज्य शहर
३९) पंकज भोयर – गृहनिर्माण