मंत्र्यांकडून खदखद व्यक्त; मित्र पक्ष युतीधर्म?

0

मुंबई – लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र महायुतीकडून अद्यापही काही जागांवर तडजोड असल्याचे पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत मंत्र्यांनी युतीधर्मावर आपल्या नाराजीला वाचा फोडली. मात्र एकनाथ शिंदे यांनी तडजोडी कराव्या लागतात, पण खासदारांवर अन्याय होणार नाही, असा शब्द दिल्याचे समजते.

शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी बैठकीत आपल्या नाराजीला वाचा फोडली. त्यांनी म्हटले की, धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळं मिळाली, मात्र आता आपलं महत्त्व कमी होताना दिसत आहे. परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युतीधर्म पाळला. पण आपले मित्र पक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत का?

रायगड, शिरूर हे मतदारसंघ आपल्या हक्काचे असतानाही मित्र पक्षाला दिले आणि अपमान गिळून त्यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आता ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर आणि पालघर मित्रपक्षांना सोडू नका, अशी विनंती आमदारांनी केल्याचे समजते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech