EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं

0

मुंबई – EVM-VVPAT च्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यापूर्वी न्यायालयाने 18 एप्रिल रोजी याचिकेवर निकाल राखून ठेवला होता आणि आज झालेल्या सुनावणीनंतरही न्यायालयाने निकाल राखून ठेवला. तर सर्वोच्च न्यायालय पुढील काही दिवसात याबाबत निकाल देणार असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, EVM-VVPAT च्या वापरासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका आणि अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने आपले उत्तर दिलं आहे. परंतु, या प्रकरणात न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मायक्रो कंट्रोलर, कंट्रोलिंग युनिटमध्ये असते का की ईव्हीएममध्ये? सिंबल लेबल युनिट किती आहेत, चिप कुठे असते? ईव्हीएम आणि VVPAT, मतदानानंतर सील करण्यात येते का? असे सवाल न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech