राज्य तायक्वांदो अध्यक्षपदी संदीप ओंबासे यांची निवड

0

कल्याण – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप ओंबासे (ठाणे) तर सचिवपदी गफार पठाण (सातारा) यांची एकमताने निवड करण्यात आली. देशातील शिखर संघटना इंडिया तायक्वांदो च्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नंदी पॅलेस हॉटेल डोंबिवली येथे संपन्न झाली. या सभेत पंचवार्षिक कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या बैठकीसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने निरीक्षक म्हणून दयानंद कुमार यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून ऍडव्होकेट शुभांगी सोनवले यांनी काम पाहिले. संघटनेचे चेअरमन म्हणून नागपूरचे आमदार मोहनभाऊ मते तर कोषाध्यक्ष म्हणून छ.संभाजीनगर चे प्रसाद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.नव-नियुक्त पदाधिकारी
अध्यक्ष – संदीप ओंबासे (ठाणे),
उपाध्यक्ष – तुषार आवटी (पुणे), घनश्याम सानप – (अहमदनगर),
महासचिव – अमजदखान (गफार) पठाण (सातारा),
सचिव – सुरेश चौधरी (सांगली),
कोषाध्यक्ष – डॉ. प्रसाद कुलकर्णी (संभाजीनगर),
कार्यकारिणी सदस्य – नारायण वाघाडे (नागपूर), पद्माकर कांबळे (कोल्हापूर),
प्रमोद दौंडे (सोलापूर)

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech