मुंबई : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले ,स्मृतीस्थळी एकनाथ शिंदेंचं नमन केले.. आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नवनियुक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शानदार सोहळ्यात शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कुलाबा येथील पोहचून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.