ठाणे – आमदार संजय केळकर यांनी नुकतीच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे व नाला सफाई पहाणी दौरा केला. या पाहणी दरम्यान कोलशेत, अमरालोढा येथील नाला पूर्ण प्लास्टिक, कचऱ्याने भरलेला दिसून आला. त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ता तयार झाल्याचे दृश्य दिसत होते. त्यावेळी आ. केळकर यांनी “नाला आहे की रस्ता” असा संतप्त सवाल प्रशासकीय प्रशासनाला केला होता. तत्काळ त्यांनी ठा म पा आयुक्त श्री. राव यांची भेट घेऊन नाला सफाई बाबत अधिकाऱ्यांनी ‘नाला सफाई केली’ आहे की ‘हात की सफाई ‘ केली आहे असा प्रश्न आज ठाणेकर नागरिक विचारत असून नाला साफ सफाई झाले नसल्याचे निदर्शनास आणले होते. तसेच नाला सफाई म्हणजे किती बे बनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून आ. केळकर यांनी आयुक्तांना नाला सफाई बाबत दिशा भूल करण्यात आली असल्याचे ही आ. केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. आयुक्तांनी तत्काळ या नाला सफाई बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणी तातडीने सदरचा नाला साफ करण्यात आला.