प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद – दिलीप वळसे-पाटील

0

पुणे : आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. मात्र, त्यांचा नागपुरात झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागली नसल्याने आता वळसे पाटील यांच्याकडून प्रकृती कारणास्तव तसेच मतदारसंघाला अधिकचा वेळ देता यावा, यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंत्रिपद घेतले नसल्याची चर्चा होत आहे. वळसे पाटील यांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. असल्याने २००३ साली ऊर्जा व तंत्र शिक्षण खात्याचे ते मंत्री होते. २००८ साली ते वित्त व नियोजन खात्याचे मंत्री होते. २००९ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रभावी कामकाज केले. या काळात विधानमंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यात विविध मंत्रिपदे सांभाळत असताना वळसे-पाटील यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

१९९७-९८ साली विधानसभेतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ या पुरस्काराने वळसे पाटील यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९९ साली त्यांना सर्वप्रथम मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २००२ साली उच्च व तंत्र शिक्षण खात्याबरोबरच ऊर्जा खात्याची जबाबदारी आली. आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. वळसे पाटील यांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९९० साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांना विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख करण्यात आले होते. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्याने शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांचे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अजित पवार यांचे पारडे जड झाले. त्यामुळे न्यायालयीन निर्णय प्रलंबित असतांनाच राज्यात विधानसभा निवडणूका लागल्या. त्यामध्ये अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारली. यामध्ये दिलीप वळसे-पाटील यांच्या विधानसभा मतदार संघात जोरदार अटीतटीची लढाई निर्माण झाल्याने अखेर विजयाची माळ दिलिप वळसे पाटलांच्या गळयात पडली. त्यामुळे पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून त्यांची मंत्रीपदी निवड अपेक्षित होती. मात्र, तसे न झाल्याने प्रकृती स्वास्थ्यामुळे मंत्रिपद नाकारले असल्याचे वळसे-पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech