डॉ. कुमार सप्तर्षी यांना बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार

0

पुणे : बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी दिली. हा पुरस्कार वितरण सोहळा ९ फेब्रुवारी रोजी कोथरूड येथील कोथरूडमधील गांधी स्मारक निधी सभागृह येथे होणार आहे. तसेच यावेळी ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास आणि कोल्हापूर येथील हसन फत्तेखान देसाई यांना संयुक्तपणे गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सप्तर्षी यांनी अनेक दशक महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केले आहे. सध्या ते ‘गांधी स्मारक निधी’ या संस्थेचे कार्यवाह असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे ते संपादक आहेत. तसेच दास हे प्रसिद्ध गांधीवादी ‘एस. एन. सुब्बाराव’ यांच्या पासून प्रेरित ‘राष्ट्रीय युवा योजना’ या संघटनेचे संचालक आहेत तर देसाई हे राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय कार्यकर्ते आणि समाजसेवक आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech