ठाणे : लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी भेट दिली. मालवणी महोत्सवात आज ५ – २५ व्यावसायिक असतील पण भविष्यात यातुनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल. असा आशावादही खा. राणे यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष राणे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग हा एकमेव पर्यटन जिल्हा म्हणुन मंजुर केल्यानंतर सिंधुदुर्गात विकास झाल्याचे सांगुन लवकरच सी वर्ल्ड आणायचय. सिंधुदुर्गात डिस्ने लँड आणायचे आहे, जागा मिळाली आहे दोन तीन खाजगी उद्योजकांशी बोललो आहे. रिलायन्सशी बोलणी झाली आहेत, काही तांत्रिक बाबीवर काम सुरू आहे. असे खा. नारायण राणे म्हणाले.
खा. नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळा सारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या २५ वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव आता होत असुन मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा ३३ टक्के हिस्सा आहे, पण मराठी माणसाचा त्यात १ टक्काही हिस्सा नाही. तेव्हा, आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा. असा सल्ला मराठी माणसाला दिला. मालवणी महोत्सवात आज हे ५ – २५ व्यावसायिक असतील पण भविष्यात यातुनच एखादा मोठा उद्योजक होईल, तेव्हा जनतेने या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या विकासात महाराष्ट्राचा ३३ टक्के हिस्सा पण मराठी माणसाचा त्यातला १ टक्काही नाही. तेव्हा देशाच्या जीडीपीमध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी, हा हेतु असल्याचे खा. राणे म्हणाले. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात एमएसएमई मंत्री असताना जिल्हयाजिल्ह्यात ७२ अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते. याची आठवण करीत त्यांनी, यापुढेही मराठी माणसासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.