महायुतीच्या माध्यमातून विकास वेगाने – संजय केळकर

0

ठाणे :  ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय केळकर यांच्या प्रचाराने आता चांगलाचा वेग पकडला आहे. केळकर यांनी मासुंदा तलाव परिसरात मॉर्निग वॉक करणाऱ्यांशी सवांद साधला. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर विकास हा होत असतो, तोच विकास मागील अडीच वर्षांत आपण राज्यात पाहत आहोत. महायुतीच्या माध्यमातून विकास कामे वेगाने सुरू आहेत अशी माहिती ठाणे विधानसभा मतदार संघाचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार संजय केळकर यांनी दिली.

यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी केळकर यांचे स्वागत केले. तसेच त्यांना विजयाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, 148 विधानसभेचे निवडणूक प्रमुख सुभाष काळे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम, शरद पुरोहित, निलेश कोळी, संतोष साळुंखे, दिलीप शहा, सचिन आळशी, किरण नाकती, निखिल बुडजडे आदी जण मॉर्निग वॉक मध्ये सहभागी झाले होते. केळकर यांनी मासुंदा तलाव परिसरात मॉर्निग वॉक करणाऱ्यांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.राज्यात डबल इंजिनचे सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे याच महायुतीच्या मागे जनता लोकसभेला देखील उभी होती. आता विधानसभेला देखील जनता महायुतीच्या मागे खांभीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मासुंदा तलाव हा ठाणेकरांचा मानबिंदू आहे. या ठिकाणी अनेक जुने जाणते लोक येत असतात आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. ठाणेकर जनता सुज्ञ आहे, त्यामुळे ते महायुतीच्या मागे उभे राहतील असेही ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech