थंडी वाढल्याने साईबनमध्ये हुरड्यासाठी गर्दी

0

अहिल्यानगर : गेल्या काही दिवसापासून नगरमध्ये थंडी मोठया प्रमाणात वाढली आहे. थंडी वाढली कि हुरड्याची आठवण येते.त्यामुळे सध्या नगरमधील एमआयडीसी जवळील निसर्गाच्या सानिध्यातील असलेल्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात मध्ये हुरडासाठी सध्या रोज गर्दी होत आहे.नोव्हेंबर पासून सुरु झालेला हुरडाचा असंख्य लोकांनी आस्वाद घेतला आहे,अशी माहिती साईबन कृषी पर्यटन केंद्राचे संचालक डॉ.प्रकाश कांकरिया यांनी दिली.

डॉ.कांकरिया दांम्पत्याच्या दूरदृष्टी व अथक परिश्रमामुळे साईबनची निर्मिती झाली.साईबन कृषी पर्यटन केंद्राचा परिसरात सर्वत्र हिरवा झालेला असून मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी, आंब्याच्या झाडाखाली वन भोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा, चटण्या,गुडीशेव,रेवडी गोड आंबट बोरे, उकडलेला मका कणीस,पेरूच्या फोडी व उसाचा रस हे सर्व असलेल्या साईबनमध्ये हुरडा पार्टी ची मजा म्हणजे अनोखा आनंद लोकांना मिळतो. नगर जिल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने साईबनच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत.सुट्टीच्या दिवशी तर मोठी गर्दी असते त्यासाठी आधी बुकिंगची सोय उपलब्ध आहे, असे डॉ.प्रकाश कांकरिया यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech