मध्य रेल्वेच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ : ८६१ मुलांचे पालकांसोबत पुन:र्मिलन

0

मुंबई : “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत मुलांची सुटका करण्यासाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १ एप्रिल ते दि. ३१ ऑक्टोबर या कालावधीत, मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने एकूण ८६१ मुलांना (५८९ मुले आणि २७२ मुली) त्यांच्या कुटुंबियांसह पुन:र्मिलनास मदत केली .रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ते सुटका केलेल्या मुलांसाठी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मानकीकृत कार्यप्रणालीद्वारे अनिवार्य केलेली जबाबदारी पार पाडत आहे. अलीकडेच दि. ०७.११.२०२४ रोजी आरपीएफ कर्मचारी ईश्वर चंद जाट आणि आर के त्रिपाठी, खंडवा स्थानकावर गस्त घालत असताना, प्लॅटफॉर्म क्रमांक ४/५ वर एक अल्पवयीन मुलगा शांतपणे बसलेला दिसला. सुमित नावाच्या मुलाचे समुपदेशन करण्यात आले आणि त्याच्या उजव्या हातावर मोबाईल क्रमांक टॅटू केलेला आढळून आला.

आरपीएफ टीमने त्या नंबरवर कॉल केला आणि त्याच्या भावाशी बोलले ज्याने सांगितले की मुलाला स्मृतिभ्रंश आहे आणि तो गोष्टी विसरतो. चाईल्ड लाईनचे दीपक लाड आणि मयूर चोरे यांच्या मदतीने मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचा भाऊ त्याला ताब्यात घेण्यासाठी येईपर्यंत नवजीवन बालगृह येथे पाठवण्यात आले. एप्रिल २०२४ – २९ मुले आणि २७ मुली- एकूण मुलांची संख्या ५६, मे २०२४ – ६१ मुले आणि ३२ मुली- एकूण मुलांची संख्या ९३, जून २०२४ – ५५ मुले आणि ४० मुली- एकूण मुलांची संख्या ९५, जुलै २०२४ – १३७ मुले आणि ६५ मुली- एकूण मुलांची संख्या २०२, ऑगस्ट २०२४ – ९७ मुले आणि ४४ मुली- एकूण मुलांची संख्या १४१, सप्टेंबर २०२४ – १२५ मुले आणि ३५ मुली- एकूण मुलांची संख्या १६०, ऑक्टोबर २०२४ – ८५ मुले आणि २९ मुली- एकूण मुलांची संख्या ११४ (एकूण मुले – ५८९, एकूण मुली – २७२, एकूण मुलांची संख्या – ८६१) काही भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech