ठाणे : भारतीय संविधान दिनानिमित्त, मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, विधि सल्लागार मकरंद काळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.